MAIN PAGE


सुस्वागतम -- शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी उपयुक्त वेबसाईट pradipchaskar.blogspot.in या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत .

MDM माहीती भरणे.

                              🔹 *MDM*🔹.   

1) सर्वांना सूचित करण्यात येत आहे की,आजपासुन ज्या शाळेत शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला जातो अशा शालेय पोषण आहाराच्या नोंदी सरल मध्ये ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या नोंदी आपणास 3 प्रकारे पुढील प्रकार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे

🔺 सरल वेबसाइट च्या माध्यमातून कशी माहिती भरावी।
व्हीडीओ पहा।  Download video

🔺  MDM मोबाइल application माहीती करता
डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
Download app

 मोबाइल application गणन क्रियेकरता
डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
Download
🔺 SHORT TEXT MESSAGE(SMS)

2) सध्या सरल वेबसाइट च्या माध्यमातून शालेय पोषण आहाराच्या नोंदी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.तसेच MDM मोबाइल application च्या माध्यमातून नोंद करण्याची सुविधा उद्या सायंकाळ पासून आणि मोबाइल द्वारे उपलब्ध असणारी SHORT TEXT MESSAGE (SMS) सुविधा पुढील काही दिवसाच उपलब्ध करुन दिली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.तशा सूचना आपणास दिल्या जातीलच.


3) सरल मधील school पोर्टल मध्ये MDM या प्रमुख tab ला क्लीक करुन आपण login करावयाचे आहे.login करत असताना id म्हणून आपल्या शाळेचा udise नंबर आणि पासवर्ड म्हणून school पोर्टल चा पासवर्ड हा MDM चा पासवर्ड असणार आहे याची नोंद घ्यावी.

4)लॉगिन केल्यावर आपणास 2 tab मध्ये काम करावयाचे आहे.
🔺 *opening balance*
🔺 *MDM Daily attendance*

5) opening balance या tab मध्ये आपणास भरावयाची माहिती ही अतिषय महत्वाची असून ती या वर्षाच्या सुरवातीलाच एकदाच भरावयाची आहे.या मध्ये मागील शैक्षणिक वर्षाअखेरचा शिल्लक धान्य साठा भरावयाचा आहे.ही माहिती एकदा भरल्यावर यापुढे आपला शिल्लक साठा ऑटोजनरेट होणार आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे ही माहिती काळजीपूर्वक  भरणे गरजेचे आहे.ही माहिती Supdt. MDM यांनी एकदा वेरीफाई केली की पुन्हा यात आपणास बदल करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

6) जर मागील वर्षी आपला धान्य साठा संपलेला असेल आणि आपण सदर धान्य अथवा धान्यादी माल उसना घेतला असेल तर अशा बाबतीत आपण आपले शिल्लक धान्य *मायनस* मध्ये लिहावयाचे आहे याची नोंद घ्यावी.आज मायनस मध्ये लिहन्याची ही सुविधा उशिरा उपलब्ध करुन दिली आहे.           
      
                                                              PTO
7) जर आपली शाळा *प्राथमिक* (1 ते 5) असेल तर तसा ऑप्शन आपण निवडून घ्यावा आणि माहिती भरावी.जर शाळा प्राथमिक असेल परंतु वर्ग मात्र 4 थी पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असेल तरीही 1 ते 5 (primary) हा ऑप्शन select करावा आणि इयत्ता मध्ये आपल्याकडे  असलेल्या इयत्ता select करुन घ्याव्या आणि माहिती भरावी.

8) जर आपली शाळा *फक्त उच्चप्राथमिक* (6 ते 8) असेल तर तसा ऑप्शन आपण निवडून घ्यावा आणि माहिती भरावी.अशा वेळी 1 ते 5 (प्राथमिक) हा ऑप्शन निवडु नये.

9)जर आपली शाळा ही *प्राथमिक व उच्चप्राथमिक* म्हणजे (1 ते 8 म्हणजे both) असेल अशा वेळी 1 ते 5 आणि 6 ते 8 म्हणजेच फक्त प्राथमिक आणि फक्त उच्च प्राथमिक हा ऑप्शन न निवडता 1 ते 8 हा ऑप्शन निवडावा आणि सर्व इयत्ता select कराव्या व पुढील माहिती भरावी.

10) धान्याची नोंद घेताना  *कि.ग्रॅ* या एककामध्ये भरवायाचे आहे.उदा., आपनाकडे धान्य हे साडे सात किलो एवढे शिल्लक असेल तर ते आपण ते 7.500 असे लिहावे.दशांश चिन्हानंतर 3 डिजिट लिहिन्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.याची नोंद घ्यावी.

11)opening balance भरल्याशिवाय daily attendance ची माहिती आपणास भरता येणार नाही आहे.त्यामुळे आपण त्वरित ही माहिती भरून घ्यावी.

12)daily attendance भरत असताना इयत्तवार उपस्थित मुले (present student) भरावे आणि त्या खाली असलेल्या रकान्यात present मुलांपैकी किती मुलांना पोषण आहार दिला गेला आहे त्या मुलांची आकडेवारी लिहावयाची आहे.या रकान्यात किती धान्य दिले गेले हे लिहावयाचे नाही हे लक्षात घ्यावे.

No comments:

Post a Comment