MAIN PAGE


सुस्वागतम -- शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी उपयुक्त वेबसाईट pradipchaskar.blogspot.in या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत .

किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन शिष्यवृत्ती

*किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेंतर्गत शिष्यवृत्ती....*


केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि बंगळुरूच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना राबविण्यात येते. 

 विज्ञान विषयासह शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तंत्र-विज्ञान विषयात उच्च-शिक्षण व संशोधनपर उत्तेजन देण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. 

या योजनेची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे –

*योजनेचा उद्देश:*

या शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश अर्हतापात्र विद्यार्थ्यांना विज्ञान विषयासह बीएस, बीएस्सी, बी-स्टॅटिस्टिक्स, एमएस्सी, एमएस यांसारख्या अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देणे हा आहे.

*आवश्यक शैक्षणिक पात्रता:*

अर्जदार विद्यार्थ्यांची पात्रका खालील नमूद केल्यानुसार असावी –

*एसए गट* : अर्जदार विद्यार्थ्यांनी २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात विज्ञान विषयासह अकरावीमध्ये प्रवेश घेतलेला असावा. 
_त्यांची दहावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी किमान ८० टक्के (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ६० टक्के) असावी._

*एसएक्स गट* : अर्जदारांनी १०+२ या शैक्षणिक अभ्याासक्रमांतर्गत २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात विज्ञान विषयासह बारावीत प्रवेश घेतलेला असावा. त्यांची शालान्त परीक्षेतील गुणांची टक्केवारी किमान ८० टक्के (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ६० टक्के) असावी.


*एसबी गट* : अर्जदारांनी २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात विज्ञान विषयासह बीएस्सी प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. त्यांची बारावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी किमान ८० टक्के (राखीव गटातील उमेदवारांसाठी ६० टक्के) असावी.

या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एकूण शिष्यवृत्तींपैकी काही शिष्यवृत्ती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.

*अर्जासह पाठवायचे शुल्क:*

_अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून एक हजार रु. संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे._
*For General Category/OBC:*
Rs. 1000  
*For SC/ST/PWD: Rs. 500*


*निवड पद्धती:*

अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांची निवडचाचणी संगणकीय पद्धतीने देशातील प्रमुख शहरांतील निवडक परीक्षा केंद्रांवर ६ नोव्हेंबर २०१६ रोजी घेण्यात येईल आणि त्याआधारे त्यांची संबंधित गटातील शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येईल.

*शिष्यवृत्तीचा तपशील या योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या कालावधीत दरमहा पाच हजार ते सात हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि त्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेच्या चौपट रक्कम वार्षिक आकस्मिक निधी स्वरूपात देण्यात येईल.*

*अधिक माहिती*
शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजने’ची जाहिरात
पाहावी अथवा 
*दि कन्व्हेनर,*
किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना,
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, 
बंगळुरू- ५६००१२ 
यापत्त्यावर चौकशी करावी 

अथवा इन्स्टिटय़ूटच्या

http://kvpy.iisc.ernet.in/main/applications.htm

*या संकेतस्थळाला भेट द्यावी.*


*अर्ज करण्याची मुदत*
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३० ऑगस्ट २०१६ पर्यंत अर्ज करावा.

*Important Dates*
Opening of online application portal : 18th July 2016
Last date for closing of online application : 30th  August 2016

Exam Date : 6th November 2016

*Support Helpdesk Details*

IF YOU REQUIRE ANY INFORMATION RELATED TO Application Form,

*CALL ON 080 - 22932975/76, 080- 23601008 & 080 - 22933536*

*Email to*

 application@kvpy.iisc.ernet.in


*THE PHONE NUMBERS ARE AVAILABLE BETWEEN 10:00 AM AND 05:00 PM.*

* Saturday and Sunday are Holidays. 

*कृपया ही माहिती गरीब आणि गरजू गुणवंत विधायार्थ्ना अवश्य कळवा आणि पूर्ण माहितीची खातरजमा करूनच संबधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढाकार घ्या.*

*अधिक माहितीसाठी या वेब पोर्टल वर भेट द्या.*

http://kvpy.iisc.ernet.in/main/applications.htm

http://kvpy.iisc.ernet.in/main/index.htm

No comments:

Post a Comment