MAIN PAGE


सुस्वागतम -- शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यासाठी उपयुक्त वेबसाईट pradipchaskar.blogspot.in या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत .

अजाण आम्ही तुझी लेकरे

 

अजाण आम्ही तुझी लेकरे
तू सर्वांचा पिता
प्रेमाने तुज नमितो गातो
तुझ्या गुणांच्या कथा...॥धु ॥

चंद्र सुर्य हे तुझेच देवा
तुझी गुरे वासरे
तुझीच शेते सागर डोंगर
फुले फळे पाखरे...॥1॥

अजाण आम्ही तुझी लेकरे
तू सर्वांचा पिता
प्रेमाने तुज नमितो गातो
तुझ्या गुणांच्या कथा...

अनेक नावे तुला तुझे रे
दाहि दिशांना घर
करिशी देवा सारखीच तू
माया सगळ्यांवर...॥२॥

अजाण आम्ही तुझी लेकरे
तू सर्वांचा पिता
प्रेमाने तुज नमितो गातो
तुझ्या गुणांच्या कथा..

खूप शिकावे काम करावे
प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा
हीच एक मागणी...॥ 3॥

अजाण आम्ही तुझी लेकरे
तू सर्वांचा पिता
प्रेमाने तुज नमितो गातो
तुझ्या गुणांच्या कथा...॥२॥

प्रेमाने तुज नमितो गातो
तुझ्या गुणांच्या कथा...

No comments:

Post a Comment