2)स्कूल पोर्टल offline माहीती भरणे
Download Downloadpdf.
Pdf of
-Pradip bhosale sir
*सरल महत्वाचे* :
*दिनांक* :13/09/2016
(ही पोस्ट सर्वांना share करावी ही विनंती)
*विषय* : *सन 2016-17 या शैक्षणिक वर्षांची शाळांची माहिती भरण्यासाठी स्कूल पोर्टल चे लॉगिन संपूर्ण महाराष्ट्रासाठी online आणि offline उपलब्ध करून देण्याबाबत* ......
*संदर्भ* : *मा. डॉ.सुनिल मगर साहेब, अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक, बालभारती, पुणे यांनी दिलेल्या सूचना* ...
मागील काही दिवसांपासून स्कूल पोर्टल मध्ये माहिती भरण्यासाठी *औरंगाबाद,नासिक आणि मुंबई* विभागातील सर्व जिल्ह्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती.परंतु आजपासून सदर सुविधा *ही राज्यातील सर्व विभागातील सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे* याची सर्वांनी नोंद घ्यावी.
ही माहिती भरण्यासाठी आपण मागील वर्षी ज्या प्रमाणे *education.maharashtra.gov.in* या website ला शाळा पोर्टल वर online पद्धतीने माहिती भरलेली होती अगदी त्याचप्रमाणे या वर्षी देखील माहिती भरावयाची आहे.तसेच मागील वर्षी online माहिती भरताना user ची संख्या वाढल्याने website वर काम करताना वेगा(speed)संदर्भात बर्याच अडचणीस सामोरे जावे लागले होते याची कल्पना आपणास आहेच.त्यामुळे या बाबींची दखल घेऊन शासनाने पहिल्यांदाच स्कूल पोर्टल माहिती online पद्धतीने भरण्याच्या सुविधेसोबतच *offline पद्धतीने* देखील भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
*Offline पद्धतीने माहिती कशी भरावी या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.तेथे आपणास मराठी मॅन्युअल उपलब्ध करून दिलेले आहे* .
✅ *Offline पद्धतीने माहिती भरण्यासंदर्भातील आजच्या काही ताज्या सूचना* :
✅ Offline पद्धतीने माहिती भरण्याची सुविधा मुख्याध्यापक लॉगिन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.
✅Offline पद्धतीने माहिती भरण्यासाठी ज्या दोन file डाउनलोड करावयाच्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी डाउनलोड करण्यासाठी मुख्याध्यापक लॉगिन ला उपलब्ध आहेत परंतु माहिती भरून झाल्यावर तयार होणारी file अपलोड करण्यासाठीची सुविधा सध्या उपलब्ध करून दिलेली नाही याची नोंद घ्यावी.
✅Offline माहिती भरत असताना file डाउनलोड केल्यावर त्या 2 झिप file D ड्राईव्ह ला ज्या फोल्डर मध्ये ठेवायच्या आहेत त्या फोल्डर चे नाव Saral असेच असणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.
✅झिप file extract करण्याआधी त्या दोन झिप file ला एक एक सिलेक्ट करून right क्लीक करून प्रॉपर्टी मध्ये जावे आणि file type हा read olny ला टिक मार्क असेल तर तो टिक मार्क काढून टाकावा.
✅त्यानंतरचे काम हे मॅन्युअल मध्ये सांगितल्याप्रमाणेच करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.
✅सन 2016-17 ची संचमान्यता साठी लागणारी स्कूल पोर्टल ची माहिती ही 30 सप्टेंबर 2016 ची ग्राह्य धरले जाणार आहे हे शासनाने या अशीच जाहीर केलेले असल्याने आपणास 30 सप्टेंबर 2016 च्या आत ही माहिती शिक्षणाधिकारी लेवल पर्यंत finalized असणे आवश्यक आहे या बाबींचे गाम्भीर्य लक्षात घेऊन *शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मुख्याध्यापक* यांनी आपापल्या कामाचे नियोजन करावयाचे आहे.शिक्षणाधिकारी आपल्या जिल्ह्याच्या कामाचे नियोजन सर्व शाळांना तसेच आपल्या यंत्रणेला कळवतील.त्यानुसार 30 सप्टेंबर 2016 ची माहिती *100% पूर्ण* करून शासनास उपलब्ध करून दिली जाईल याची काळजी यंत्रणेने घ्यावी व दिलेल्या मुदतीत सर्व काम पूर्ण करावे.
*Online पद्धतीने काम करताना महत्वाच्या सूचना* :
✅मागील वर्षी प्रमाणे या वर्षी देखील माहिती त्याच पद्धतीने भरावी.
*मुख्याध्यापल प्रमाणे केंद्रप्रमुखाने देखील आपल्या लॉगिन मधून सदर माहिती त्वरित finalized करून पुढे पाठवावी* .
या वर्षीच्या माहितीमध्ये आणि मागील वर्षीच्या माहितीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक आढळून आल्यास ती माहिती वेरीफाय करण्यासाठी यंत्रणेला कळवली जाणार आहे.
उदा., मागील वर्षीच्या वर्गखोल्याची संख्या आणि या वर्षीच्या वर्गखोल्याची संख्या यात जर उल्लेखनीय फरक आढळला तर ही माहिती डायरेक्टर कार्यालय आणि शिक्षणाधिकारी यांना वेरीफाय करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.हेतुपुरस्कर चुकीची माहिती भरणाऱ्या शाळेवर योग्य ती करवाई करण्यात येणार आहे अशा सूचना प्राप्त झाल्या आहेत याची नोंद घ्यावी.
✅Online माहिती भरताना बेसिक या tab मधील बऱ्याच स्क्रीन या मागील वर्षी भरलेल्या आहेत त्या ऑलरेडी finalized झालेल्या अवस्थेत दिसून येतील.त्यात काही बदल करावयाचा असेल तर तो बदल शाळा लेवल ला करता येणार नाही आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.अशा शाळांनी आपल्या शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.
✅Online काम करत असताना मागील वर्षी भरलेली माहिती ही त्या त्या स्क्रीन मध्ये भरलेल्या अवस्थेत दिसून येईल.त्या स्क्रीन मध्ये जेवढा बदल आहे तो करावा आणि स्क्रीन finalized करावी तसेच बदल नसेल तर आहे तशी माहिती save आणि finalized करावी.
*शाळा पोर्टल* :
1) आज पासून स्कूल पोर्टल ची माहिती भरण्यासाठीची online आणिoffline शाळा पोर्टल माहिती भरण्यासाठी *15 सप्टेंबर 2016* ही राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी अंतिम मुदत आहे.या वर्षीची संचमान्यता या माहीन्याअखेर करावयाची असल्याने सदर काम प्राधान्याने करावयाचे आहे म्हणून आपणास मुदत वाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
2)ऑफलाईन माहिती भरताना कशा पद्धतीने भरावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन व *मराठी manual* आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला उपलब्ध करून दिलेले आहे.
3)ऑफलाईन माहिती भरत असताना ही माहिती फक्त internet explorer या browser मध्येच भरायची आहे,यासाठी mozilla अथवा crome या ब्राऊजर चा उपयोग करू नये.तसेच Internet explorer चे व्हर्जन हे 9 च्या पुढचे असावे.अन्यथा software काम करणार नाही याची नोंद घ्यावी.
4) ऑफलाईन माहिती भरताना डाउनलोड केलेल्या file या c ड्राईव्ह मध्ये न ठेवता D ड्राईव्ह मध्ये save करावी आणि मगच extract करावी,अन्यथा आपण भरत असलेली माहिती save होणार नाही किंवा माहिती भरत असताना software योग्य पद्धतींने काम करणार नाही याची नोंद घ्यावी.
5)आपण ऑफलाईन पद्धतीने माहिती भरल्यानंतर योग्य पद्धतीने भरलेल्या स्क्रीन या सरळ केंद्रप्रमुखाच्या लॉगिन ला verification साठी उपलब्ध होईल याची नोंद घ्यावी.ज्या स्क्रीन चूकतील त्या मुख्याध्यापक लॉगिन ला दूरस्थ करण्यासाठी उपलब्ध असतील
6) ज्या शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही अशा शाळेस माहिती भरण्यासाठी ऑफलाईन सुविधा उपलब्द्ध केलेली आहे.अशा शाळा आपल्या केंद्रप्रमुखाकडून किंवा गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून ऑफलाईन माहिती भरावयाचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून घेतील.त्यांनी ते उपलब्ध करून द्यायच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आलेल्या आहेत.
8) शाळा माहिती ऑफलाईन भरताना इंटरनेट explorer मधील काही सेटिंग change कराव्या लागतात.सेटिंग काय असाव्या या जाणून घेण्यासाठी माझ्या ब्लॉग ला भेट द्या. आपली शाळांची माहिती भरून झाल्यावर इंटरनेट explorer सेटिंग security कारणास्तव पुन्हा आहे तशी म्हणजे डिफॉल्ट करून घेणे गरजेचे आहे याची नोंद घ्यावी.
-Pradip bhosalesir post
2)) इयत्ता १ली नविन विद्यार्थी नोंद करणे. Download PDF
*सरल महत्वाचे* :
*दिनांक : २४/०८/२०१६*
(कृपया सर्व बांधवांना share करावे ही विनंती)
*student पोर्टल* :
१)सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता १ ली च्या मुलांची सरल student पोर्टल मध्ये माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.दिनांक २३ ऑगस्ट पासून पुणे जिल्ह्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.दिनांक 25 ऑगस्ट पासून ही सुविधा संपूर्ण राज्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता लवकरच पूर्ण करावयाची असल्याने ही माहिती दिलेल्या वेळेत भरणे अत्यावश्यक आहे.या माहितीसाठी मुदत वाढ देण्यात येणार नाही आहे ही बाब या वेळी लक्षात घ्यावी.
२)नविन विद्यार्थ्यांची माहिती कशी भरावी याबाबत सखोल आणि विस्तृत माहिती आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी.
*नवीन विद्यार्थी माहिती कशी भरावी यासाठीचे Manual डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा* : http://goo.gl/qikIvJ
३)इयत्ता १ ली व्यतिरीक्त इतर वर्गातील मुले जी मागील वर्षी भरावयाची राहून गेलेली आहे त्या मुलांची माहिती भरण्यासाठीची सुविधा योग्य वेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्याविषयी काळजी करू नये.
४)इयत्ता पहिली वगळता ज्या मुलांची माहिती मागील वर्षी नोंद झालेली आहे अशा ट्रान्स्फर झालेल्या मुलांची माहिती त्या जुन्या शाळेतून ट्रान्स्फर करून घेणे बंधनकारक आहे.काही शाळा ट्रान्स्फर झालेल्या मुलांची माहिती नविन विद्यार्थी म्हणून भरण्याचा प्रयत्न करतील म्हणून सध्या फक्त पहिलीचे विद्यार्थी भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.तसेच इतर इयत्तांच्या मुलांची माहिती जे मागील वर्षी नोंद झालेले नव्हते त्यांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या नंतर फक्त अशाच मुलांची माहिती आपणास भरता येणार आहे ज्यांची खरोखर मागील वर्षी नोंद झालेली नव्हती.जर मागील वर्षी नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची इतर शाळेत ट्रान्स्फर झाली असेल आणि नविन शाळेच्या मुख्याध्यापकाने जर त्या विद्यार्थ्याला जुन्या शाळेतून ट्रान्स्फर करून न घेता नविन विद्यार्थी म्हणून भरावयाचा प्रयत्न केला तर system अशा मुलांची माहिती स्वीकारणार नाहे याची गांभीर्याने नोंद घ्यावे.त्यासाठी आपण ट्रान्स्फर होऊन आलेल्या मुलांची माहिती त्वरीत जुन्या शाळेतून ट्रान्स्फर करून घ्यावी.
५)जर आपण ट्रान्स्फर विनंती केलेल्या मुलाची माहिती जुन्या शाळेतले मुख्याध्यापक ट्रान्स्फर विनंती approve करत नसतील आणि त्यामुळे जर नविन शाळेला संच मान्यतामध्ये काही समस्या निर्माण झाल्या तर त्यासाठी जुन्या शाळेतल्या मुख्याध्यापकाला दोषी धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.
६)ट्रान्स्फर विनंती पाठवली जात नाही,ट्रान्स्फर विनंती approve होत नाही,approve होऊन आलेले विद्यार्थी update ला दिसत नाही अशा समस्या काही शाळांना येताना दिसून येत आहे,अशा समस्या अशाच शाळांना आहे ज्यांची मागील वर्षीच्या data मध्ये technical error आलेला आहे.उदाहरणार्थ रजिस्टर नंबर लिहिताना अंका सोबत अक्षरे भरलेले असणे,तुकडी भरताना चुकीच्या format मध्ये भरणे,मुलांची माहिती .csv मध्ये convert करून upload करताना चुका झालेल्या असणे इत्यादी.अशा शाळांना विनंती आहे की आपणास अशा समस्या असतील तर कृपया आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या समस्या सविस्तर लिहून पाठवा.आपल्या माहितीमध्ये पूर्वी झालेल्या चुका दुरुस्थ करून आपल्या या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आपण या बाबीचा गांभीर्याने विचार केला नाही तर आपणास संच मान्यता,udise,पायाभूत चाचणी व अन्य परीक्षेचे गुण भरताना अथवा मुलाच्या लाभाच्या शासकीय योजना राबवताना online माहितीमध्ये समस्या निर्माण होऊ शकणार आहे.यासाठी आपण पुढील लिंक ला क्लिक करून आपली समस्या त्वरीत कळवा.समस्या मांडताना समस्येविषयी सविस्तर माहिती भरा.माहिती भरत असताना समस्या नसताना विनाकारण काहीही लिहित बसू नये,त्रास होईल असे लिखाण करू नये.आम्ही आपणास केवळ आणि केवळ मदत करण्याच्या हेतूने ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत याची नोंद घ्यावी.
*समस्या कळवण्यासाठीची लिंक* :
http://goo.gl/9vBAQ8
७)नविन विद्यार्थी माहिती भरताना जर इयत्ता पहिलीला मागील वर्षीपेक्षा या वर्षी तुकडीची संख्या वाढली असेल तर आपणास या वर्षी तुकडी वाढवून घ्यावी लागेल.तुकडी वाढवली तरच आपल्याला excel sheet उपलब्ध होईल.तुकडी वाढवण्यासाठी create division ची tab आपणास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
८) या वर्षी नविन शाळा चालू झालेली असेल तर आपल्या शाळेचा udise आणि password साठी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
९)अद्यापही बऱ्याच गटशिक्षणाधिकारी लेवल वर ट्रान्स्फर च्या विनंती पेंडिंग आहे.तरी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना विनंती आहे की आपण त्वरीत या सर्व विद्यार्थ्यांची शहानिशा करून त्याना ट्रान्स्फर करावे.तालुकानिहाय पेंडिंग स्थिती बाबतच्या आकडेवारीची माहिती शिक्षणाधिकारी यांच्या login ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.अशा पेंडिंग कामाच्या पूर्ततेबाबत शिक्षणाधीकारी यांनी त्वरीत कार्यवाही करावी अशा सुचना E-GOVERNANCE सेल चे अध्यक्ष तथा शिक्षण संचालक ,बालभारती मा.डॉ.सुनील मगर साहेब यांच्याकडून या पोस्ट द्वारे देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.आपले काम अपूर्ण राहिल्यास भविष्यात होणाऱ्या online कामात अडचण निर्माण झाल्यास संबंधिताना जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.
१०)आपणास हे देखील कळविण्यात येत आहे की मागील १० दिवसापूर्वी विद्यार्थांची आधार माहिती भरण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.अद्यापही बऱ्याच मुलांची माहिती भरली गेलेली नाही आहे.तरी ती माहिती त्वरीत भरण्यात यावी.या वर्षी आपणास १००% मुलांची आधार माहिती भरावयाची आहे.ज्या मुलांनी अद्याप आधार नंबर मिळवला नसेल अशा मुलांच्या पालकांचे प्रबोधन करून त्याच्याकडून त्वरीत आधार नंबर मिळविण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक यांनी करावयाचा आहे.आधार नंबर कसे भरावयाचे आहे याबाबत सविस्तर माहितीपत्रक मॅन्युअल havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला उपलब्ध करून दिलेले आहे.
११)student पोर्टल संदर्भात सर्व प्रकारच्या कामासाठीचे manual पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.तसेच आपण havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट देऊन याबाबत सविस्तर माहिती मिळवू शकाल.
12) *duplicate विद्यार्थी सिस्टिम मधून कसे काढावे यासाठीचे मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा* :
http://goo.gl/7lSj8b
*school पोर्टल* :
१3)या शैक्षणिक वर्षात शाळा पोर्टल मध्ये आपणास माहिती भरण्यासाठीची सुविधा येत्या २ दिवसात उपलब्ध करून दिली जाणार आहे.या वर्षी माहिती भरण्यासाठी आपणास ही सुविधा offline पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.offline पद्धतीने माहिती कशी भरावी यासाठीची काही दिवसापूर्वीच
E-GOVERNANCE सेल कडून राज्यस्तरीय विभागीय ट्रेनिंग घेण्यात आलेल्या आहे.सर्व शिक्षक बांधवाना या ट्रेनिंग जिल्हा,तालुका पातळीवरून दिल्या जाव्यात अशा सुचना E-GOVERNANCE सेल चे अध्यक्ष तथा शिक्षण संचालक ,बालभारती मा.डॉ.सुनील मगर साहेब यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.आपणास सदर बाबतीत ट्रेनिंग मिळाली नसेल अथवा अडचण निर्माण होत असेल तर कृपया आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा ही विनंती.तसेच या बाबतीत school पोर्टल ला लवकरच manual देखील उपलब्ध करून देण्यात येईल याची नोंद घ्यावी.याबाबत आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला भेट देऊन याबाबत सविस्तर माहिती मिळवू शकाल.
*MDM (शालेय पोषण आहार पोर्टल)* :
१४)शालेय पोषण आहार योजनेंतर्गत opening balance, daily attendance, stock inward बाबत माहिती सरल पोर्टल मध्ये नोंद्विन्याबाबत या शैक्षणिक वर्षापासून सूचना देण्यात आलेल्या आहेत.परंतु अद्यापही काही शाळांची माहिती पूर्ण झालेली नाही आहे असे दिसून आले आहे.अशा शाळांची माहिती पूर्ण करण्याच्या हेतूने शासनाने अंतिम मुदत वाढवून दिनांक २५ ऑगस्ट २०१६ दिलेली आहे.या नंतर आपणास मुदत वाढवून देण्यात येणार नाही अशा सुचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहे याची नोंद घ्यावी.
१५)मुख्याध्यापकाच्या दुर्लक्षामुळे जर सदर माहिती भरण्याची अपूर्ण राहिल्यास संबंधित आहाराचे बील देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची असेल असेही वरिष्ठ कार्यालयाकडून कळविण्यात आलेले आहे.त्यामुळे सर्वाना विनंती आहे की दिनांक २५ ऑगस्ट पर्यंत आपली माहिती भरण्यात यावी.
१६)ज्या शाळेचा ओपेनिंग balance चुकला असेल आणि beo लेवल वरून verify झालेला असेल तसेच stock inward भरून beo ने verify केलेला असेल तर अशा शाळेचा ओपेनिंग balance व stock inward दुरुस्थ करण्यासाठी तो ओपेनिंग balance व stock inward शिक्षणाधिकारी यांना परत पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
१७)daily attendance ची माहिती शाळेला रोजच्या रोज पाठवणे बंधनकारक आहे.ही माहिती भरण्यासाठी एक मोठा बदल करण्यात आलेला आहे.आपण ही माहिती रोज सकाळी ९:३० नंतर भरू शकणार आहात.त्या अगोदर आपणास ही माहिती भरता येणार नाही.
१८)एखाद्या दिवशी काही महत्वाच्या अडचणीमुळे शालेय पोषण आहार शिजवून दिला नसेल तो का देण्यात आलेला नाही याबाबत system मध्ये कारण नमूद करावे लागतात.या कारणाच्या लिस्ट मध्ये आता other या नविन कारणाचा समावेश करण्यात आला आहे याची नोंद घ्यावी.
19)✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :
आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)
20) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com किंवा
c)support.education@maharashtra.gov.in
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: idreambest@gmail.com
Blog: havelieducation.blogspot.in
Apps link of my blog's for download : Www.appsgeyser.com/2460364
Thanks &Regards
-Pradip chaskar
सर आपला ब्लॉग पाहिला,असा शैक्षणिक माहितीने परीपुर्ण ब्लॉग तयार करण्यासाठी काय करावे?
ReplyDeleteश्री महादेव विद्यालय धनेगाव ता.देवणी जि.लातुर येथे मी एक शिक्षक आहे.आपली मदत मार्गदर्शक ठरेल.
बदली प्रक्रिया सुरू आहे का
ReplyDeleteखूपच छान ब्लॉग सरजी
ReplyDelete